शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाले आहे. शरद पवारांवरी आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तिच्यावर पुण्यात राष्ट्रवादीच्या संस्कृतिक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी यानंतर राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांनी ठाण्यातील कळव्यात गुन्हा दाखल केली होती. "८३ वर्षाच्या व्यक्तीबद्दल तुम्ही असे बलू शकत नाही. तुम्हाला पण बाप्प आहे ना. आणि त्यांनी लवकर वरती जावे, अशी तुम्ही प्रार्थना करता का?, तुमच्या बाप्पाला १०० वर्ष जगावे, अशी प्रार्थना करताना," असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कार्यकर्ता वेडा असतो. त्याचे आपल्या बाप्प-आई प्रमाणे शरद पवारांवर प्रेम आहे. तो हे सर्व सहन करणार नाही. इतक्या खालच्या पातळीवर जावून तुम्ही आमच्या बाप्पावर टीका करू शकत नाही. त्यांची लाळ गळते, त्यांना नरक मिळाला पाहिजे, ते लवकर मेले पाहिजे. ८३ वर्षाच्या व्यक्तीबद्दल तुम्ही असे बलू शकत नाही. तुम्हाला पण बाप्प आहे ना. आणि त्यांनी लवकर वरती जावे, अशी तुम्ही प्रार्थना करता का?, तुमच्या बाप्पाला १०० वर्ष जगावे, अशी प्रार्थना करून, भलेही तुम्ही आमचे विरोधक असाल, महाराष्ट्राने हेच शिकविले आहे. कोणाच्या व्यंगावर आणि आजारावर टीका करायची नसते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीकेली आम्ही त्या सर्वांना सडेतोड उत्तर दिले. शरद पवारांनी कविता वाचून दाखविली त्यावर टीका झाली त्यावर मी सडेतोड उत्तर दिले. ही वैचारिक लढाई आहे. आणि ही लढाईची यात मज्जापण येते. यातून आपले ज्ञानही कळते की, आपले वाचन किती आहे आपण किती खोलवर हे सर्व जाणतो. शरद पवार तर सगळेच जाणतात. आपण एक टक्का तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का?, आणि आम्हाला कोणी कारवाई करण्यासाठी सांगितले नाही. मीच बोलो, पण, महाराष्ट्रभरात आज २०० ते ३०० गुन्हे दाखल झाले तर पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावताना पुढची दोन वर्ष लागतील. हे जे नवीन असतात त्यांना माहिती नसते की कायद्याने काय काय घडते. नंदुबारमधील एका छोट्याच्या तालुक्यात गुन्हा दाखल झाला ना तर तुम्हाला नंदुबारला हजेरी द्याला जावे लागेल. ती हजेरी रद्द करायची असेल तर तुम्हा हायकोर्टात जावे लागेल. हे सर्व त्रास आम्ही बघितलेले आहे. त्यामुळे नवीन पिढीने हे बघू नये. हा माझा प्रेमाचा सल्ला आहे."

राष्ट्रवादीकडून केतकीवर कळव्यात गुन्हा दाखल

केतकी चितळेंनी शरद पवारांविधात पोस्ट केल्यानंतर त्यांना ट्रोल केले होते. यानंतर केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात तिच्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Next Story
Share it
Top
To Top