मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो! - नाना पटोले

मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो! - नाना पटोले

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर नाना पटोलेंवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागली. 'मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो', असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोलेंनी केले. यानंतर नाना पटोलेंनी त्यांच्या वक्तव्यावरून युटन घेत, ते ट्वीट करत म्हणाले, "मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो."

नाना पटोले ट्वीटमध्ये म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो." तसेच पटोलेंनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले, "त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाच गावगुंड आहे. त्याची तक्रार गावकरी माझ्याकडे करत होते."पंतप्रधानांविरोधात नाही तर मोदी नावाच गावगुंड ते वक्तव्य - नाना पटोले

"त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाच गावगुंड आहे. त्याची तक्रार गावकरी माझ्याकडे करत होते. जो गावगुंड मोदी आहे त्यांच्याविरोधात माझे हे व्यक्तव्य आहे. या व्हिडिओमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव कुठे घेतले नाही. आणि मी अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करत नाही. तुम्ही व्हायरल व्हिडिओ पाहा मी प्रधानमंत्री आणि नरेंद्र पण शब्द वापरलेला नाही. मी मोदी असा शब्द वापरला. माणूस हा केव्हा घाबरतो, जेव्हा त्याचे घर काच्चे असते, तेव्हा तो घाबरतो. माझे घर काच्चे नाही. त्यामुळे मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. गावातील लोक माझ्याकडे गावगुंडची तक्रार करत होते. आणि योगा योगाने त्यांचे नाव मोदीच आहे. माझा व्हायरल होणार व्हिडिओ हा कुठल्या सभेतला नसून मी गावकऱ्यांचे ऐकून त्यांना समजून सागत होतो," असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष पणाचा इतका बालीशपणा मांडून ठेवलाय - प्रवीण दरेकर

"नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना असे वाक्य बोले असतील ते अत्यंत दुदैवी आणि राजकारणासाठी चिंता करण्यासाठी आहे," अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना केले आहे. "खरे पाहायला गेले तर नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारचे वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी अनेकदा केले आहे. मोदीला मारू शकतो, बोलू शकतो इतपर्यंत ठिक आहे. राजकारणात आपण वेगवेगळ्या लोकांवर टीका करत असतो. राजकीय टीका असतात, सरकारवर टीका करतो, परंतु अशा प्रकारचे व्यक्तव्य हे भयानक आहे, काँग्रेसला आज देशभरात यश नसले तरी व्यैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे. या पक्षातील अनेक नेते हे वगळ्या व्यक्ती महत्वाचे होऊ गेलेत. आजही आहेत. परंतु नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पणाचा इतका बालीशपणा मांडून ठेवलाय. की आता ते नेहमी बालीश व्यक्त करत असतात," ते म्हणाले.
Next Story
Share it
Top
To Top