संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

मुंबई | 'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तकातील संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रकाशक आणि लेखिकेने माफी मागितली आहे. सर्व शिक्षा अभियानात या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकातील मजकूर संभाजी महाराजांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात असल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला होता. या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे आणि नागपूर येथील प्रकाशक लाखे यांनी प्रकाशित केले आहे.

'संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता', या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा मजकूर या पुस्तकात आहे.

सर्व शिक्षा अभियानात देखील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाचा समावेश आहे. कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आली होती. असा चुकीचा आणि अपमानास्पद मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे दुर्दैवी आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले होते.


Next Story
Share it
Top
To Top