HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक! – छगन भुजबळ

नाशिक | कोरोनाचा प्रसार सगळीकडे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराची जोखीम कमी होत असल्याने सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज (२३ जानेवारी) येवला तालुक्यातील नागडे आणि सायगाव येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, अरुण थोरात, ज्ञानेश्वर शेवाळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सागर चौधरी, तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता प्रशांत कुलकर्णी ,ऍड.आर डी खैरनार,विजय खैरनार, नागडे येथील सरपंच प्रगती सताळकर, उपसरपंच अप्पासाहेब सताळकर सायगावचे सरपंच दीपक खैरनार, उपसरपंच गणेश माळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना महामारीसारख्या संकटाचा आपण सर्व मिळून वेळोवेळी सामना करत आहोत. त्यामुळे नागरिकांनी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना नियमांचे पालन करून लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मांजरपाडा कालव्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नागडेगांव येथील कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत महादेव मंदिर समोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये आणि लक्ष्मी आई मंदिर समोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये निधीच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

सायगांव येथील कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सायगांव येथे समाज कल्याण योजनेतून सुशोभिकरण १५ लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग ६५ व रस्ता कॉक्रीटीकरण ५० लाख, आण्णाभाऊ साठे नगर व आंबेडकर नगर विकास योजना अंतर्गत पूरक पाणीपुरवठा योजना १७ लाख रुपये, सायगांव ते रामवाडी जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याचे काम १५ लाख रुपये, १५ व्या वित्त आयोग अंतर्गत शौचालय बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन ३ कोटी ६५ लाख रुपये याकामांचे भुमीपूजन आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत सोलर युनिट बसवणे २ लाख रुपये, १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीत पाण्याचे नळाला मीटर बसविण्यासाठी १० लाख रुपये, आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सौरदीप बविण्यासाठी ६ लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत दत्तवाडी येथे सभा मंडपासाठी १५ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा सायगांव प्रोजेक्टर उद्घाटन-  शरद भालेराव यांचे लोकसहभागातून ०.६५ लाख रुपये कामांचे उद्घाटन व ज्येष्ठ नागरिक बशीरभाई शेख यांच्या कविता संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासनाने मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk

चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ची बाटली देत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला, “यानेही डोकं शांत झालं नाही तर…”

News Desk

पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाही’, विनायक मेटेंचा विश्वास

News Desk