HW News Marathi
महाराष्ट्र

परळी मतदार संघातील रस्त्यांच्या विकास कामांवरून मुंडे बहीण-भावातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

बीड | परळी मतदार संघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या रस्त्यांच्या विकास कामावरून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून भूमिपूजनास सुरुवात झाली आहे. दरम्यान झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधत, ही काम भाजपच्या माध्यमातून होत आहे. असं म्हणणं हा त्यांचा गोड गैरसमज असल्याचं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे.

धनंजय मुंडे बोलतांना म्हणले की, भाजपच्या काळात आलेली कामे रद्द झाली असून नव्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मे महिन्यात नवीन लोकप्रतिनिधी च्या सांगण्यावरून ही कामे आणली असल्याचे धनंजय मुंडे म्हणले तर नाव न घेता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लगावला टोला म्हणाले, त्यांनी जर एवढी मोठी कामे केली असती तर 2019 च्या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीशी असती अशी खोचक पणे प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या विकास कामावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा नवा वाद चव्हाट्यावर आला असल्याचे पाहवयास मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna

भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला! – उद्धव ठाकरे

Aprna

व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनात ‘जयंत ॲग्रो २०२१’ ॲपचे अनावरण

News Desk