"बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल", राऊतांचा भाजपला टोला

बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल, राऊतांचा भाजपला टोला

मुंबई | "बुस्टर डोस मला माहित नाही. पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल," असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपला लागवला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (१४ मे) वांद्रे पूर्वच्या एमएमआरडीए मैदानात होणार आहे. या सभेसंदर्भात राऊतांना प्रसार माध्यमांनी बोलताना भाजप आणि आमदार रवी राणा, त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. आहे.

राऊत म्हणाले, "महाराष्ट्र, देशाचे राजकारण वातावरण आणि या वातावरणावर आलेला मळप, धूक, गढूळपणा हे आजच्या सभेने दूर होईल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने पूर्णपणे दूर होईल. आणि महाराष्ट्राचे आकाश निरभ्र होईल. आणि येथे फक्त भगव्या रंगाचा धनुष्य या आकाश दिसेल. आम्हाला गर्दी जमावावी लागत नाही. आम्हाला आणणावी लागतन नाही. हा कोणाचा बुस्टर डोस मला माहित नाही. पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटके बाजी असते. वी आर मास्ट ब्लास्टर."

उद्धव ठाकरेंची होणारी सभा ही क्रांती सभा असेल, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना म्हणाले, "शिवसेना आणि गर्दी यांचे एक नाते आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दीला जमावावी लागत नाही. आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेब यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमच्या मराठी माणसासंदर्भातील विचार, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भाचा विचार आणि विकासाचा विचार. यामुळे शिवसेना विचाराचा लोहचुंबक आहे. त्यामुळे लोक शिवसेनेकडे आपोआप येत आहेत. खास करून आज उद्धव ठाकरेच्या भाषणाची एक उत्सुकता महाराष्ट्र आणि देशाला आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल, अशी आजची सभा आहे."

काही लोक राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत

आजची सभाही शंभर संभाची बाप आहे. मुंबईत कोव्हिडच्या काळानंतर शिवसेनेची सभांची परंपरा विराट आहे. दोन अडी वर्षात अशा प्रकारची जाहीर सभा आणि रेली मुंबईत होणार आहे. मुंबईत लाखोच्या संख्येने लोक आजच्या सभेला येणार आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण एकणार असून देशभरात त्यांच्या भाषणासाठी लोक उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे, कोणती दिशा आणि कोणती भूमिका घेणार, हे जाणून घेण्यासाठी देशातील जनता उत्सुक आहेत. यामुळे या सभेसाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारे लोक त्या सर्वांची इच्छा होती की, यामुळे आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. आज होणारी सभा ही ऐतिहासिक आणि क्रांतीक्रारी होणार आहे. काही लोक महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक महाविकासआघाडी सरकारला बदनाम करणार आहे. काही लोक राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत राऊतांनी नाव न घेता राणा दाम्त्यांवर निशाणा साधला
Next Story
Share it
Top
To Top