मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

मुंबई | "मी सचिन अंदुरे यांच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला", अशी कबुली डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशियित आरोपी शरद कळसकर याने दिल्याचा खुलासा सीबीआयकडून करण्यात आला आहे. शरद कळसकर याने त्याच्या न्याय वैद्यकीय चाचणीत ही कबुली दिल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.

कळसकरच्या कबुली दिल्यानंतर सीबीआय यासंदर्भात न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. हत्या प्रकरणी सीबीआने कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात अ‍ॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top