उत्पल पर्रिकरांना तिकीट दिलं तर..; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना चॅलेंज

उत्पल पर्रिकरांना तिकीट दिलं तर..; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना चॅलेंज

पुणे | विधानसभा निवडणुकीमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उत्पल पर्रिकर यांचं तिकीट जर भाजपने नाकारले आणि ते अपक्ष म्हणून निवडणुकीस उभे राहिले तर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटीलांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार व संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे सर्व पक्षांना आवाहन केले आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकीट द्यावं म्हणून संजय राऊत उठाठेव कशाला करत आहेत. तिथे त्यांचं ऐकायला कोण बसलं आहे का? संजय राऊतांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी गोव्यातील एखादा मतदारसंघ लढवून दाखवावा", असं पाटील म्हणाले.

तिकीट दिलं तर निवडणूक बिनविरोध कराल का?

तर राऊतांना मनोहर पर्रिकरांच्या मुलाविषयी फारच प्रेम आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी राऊतांना टोलाही लगावला आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचे की नाही, याबद्दल अजून भाजपने निर्णय घेतलेला नाही. परंतु, जर उद्या भाजपने पर्रिकरांच्या मुलाला तिकीट दिलं तर सर्व विरोधी पक्ष त्या मतदार संघातून लढणार नाहीत आणि ही निवडणूक बिनविरोध करतील का, संजय राऊतांनी याचं उत्तर द्यावं, असा सवालही पाटलांनी उपस्थित केला आहे.
Next Story
Share it
Top
To Top