अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्त मजुरीची शिक्षा

अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्त मजुरीची शिक्षा

बीड | राज्यभर खळबळ उडविणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड जिल्ह्यातील डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात परळी येथील बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, पत्नी डॉ. सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर यांना दोषी अढळले असून १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांना प्रत्येक ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील ११ आरोपींना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे.

मे २०१२ मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यानुसार, सेक्शन ३अ, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन ४ आणि ६ चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता.


Next Story
Share it
Top
To Top