मुंबई | "विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत," असे ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील ४५ ते ५० वयोगटातील व्यक्तींना पालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचे चर्चा फेटाळल्या आहे. आगामी काळात मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमवीर ४५ ते ५० च्या वयोगटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसल्याच्या चर्चा गेल्या दोन ते तीन दिवस रंगल्या होत्या. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी काल (९ जानेवारी) ट्वीट करत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, "विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते." याआधी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत म्हणाले, "तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून संकटाला आम्ही सामोरे जावू, मग आदित्य ठाकरे जाईल." महापौरांनी आज (७ जानेवारी) मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हे मार्गदर्शकाच्या भूमिके असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरच महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात असून शिवसेनेत ४५ ते ५० च्या वयोगटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही. शिवसेनेचे या निर्णयामुळे या पालिका निवडणुकीत तरुण पिढीला उमेदवार देणार असल्याची माहिती हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टलने त्यांच्या रिपोर्टमध्ये दिली होती.