शिर्डीत तिहेरी हत्याकांड, १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिर्डीत तिहेरी हत्याकांड, १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | शिर्डीत तिहेरी हत्याकंडने एकच खळबळ माजली. शिर्डीतील निमगाव येथील विजयनगरमध्ये आज (१३ जुलै) सकाळी साडेसहाच्या सुमारास कुटुंबातील तिघांची हत्या झाली आहे. या कुटुंबातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी संस्थान रुग्णालयात दाखल केले आहे. शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहे. आरोपीने कोयत्याने वार करून तिघांची हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी अर्जुन किसन पन्हाळे आरोपीला ताब्यात घेतले असून या हत्याकंडामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नामदेव ठाकूर (वय ५०), खुशी ठाकूर (१५ वर्ष), दगाबाई नामदेव ठाकूर (४५ वर्ष) ही मयतांची नावे आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.


Next Story
Share it
Top
To Top