"प. बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील 'या' दहशतवाद्यांशी सामना करेल!"

प. बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील या दहशतवाद्यांशी सामना करेल!

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये आम्ही भाजपला पुरुन उरलेलो आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र ही या दहशतवाद्यांशी सामना करेल, अशी खात्री आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी काल (१ डिसेंबर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेटीदरम्यान सांगितले. राऊतांनी आज (१ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

"ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि एनसीबी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत, असे मी कालच्या भेटीत दीदींना सांगितलं", असे राऊत म्हटले. राऊत पुढे म्हणाले, "जय बांगला, जय मराठा' अशी. ही दोन्ही राज्य एकत्रितपणे लढतील अन्यायाशी, असत्याशी आणि विजयी होतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला."

बनर्जींनी बंगालमध्ये भाजपची हवा काढली

ममता यांनी काँग्रेसपासून दुरावल्या आहेत, पत्रकारांचा राऊत म्हणाले, “हा त्यांचा पश्चिम बंगालचा राजकीय विषय आहेत. बंगालमध्ये डावेही भुईसपाट झाले आहेत. आणि बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपले असून इतर कोणतेही पक्ष राहिलेले नाहीत. शेवटी भाजपचे पथक बंगालमध्ये वाजत गाजत आले होते. मात्र, या बेडबाजाची ममता दीदींनी त्यांची हवा काढून घेतली. जे भाजपचे लोक तेथे निवडून आलेत. ते सुद्धा फुटून बरेच लोक पुन्हा परत ममता दीदींच्या पक्षात गेले आहेत. तसेच बंगालमध्ये काँग्रेस तिथे नाहीये ममता दीदी मुळच्या काँग्रेसच्या आहेत. त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आहेत. तरही आम्हाला वाटते, की एक समर्थ अशी आघाडी उभी करायची आहे,असे शरद पवार यांचे मत आहे. आपल्या सर्वांना एकत्र घेऊनच जावे लागेल.

बनर्जींनी दिले गिफ्ट

“बनर्जी यांचा दौरा शासकीय कामासाठी असला. जेव्हा त्या मुंबईत येतात. तेव्हा त्या नेहमी ठाकरे कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची त्या भेट घेतात. मागच्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही ही त्यांची कोलकत्तामध्ये जावून भेट असतो. ममतांनी काल (३० नोव्हेंबर) आदित्या ठाकरे यांनी ममताजींचे स्वागत केले. ममताजींनी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती. परंतु रुग्णालयातील बायो बबलमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. मुख्यमंत्र्यांनी बॅनर्जींना भेट वस्तू दिल्या आहेत. तसेच बॅनर्जींनी देखील आदित्य ठाकरेंना रविंद्रनाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराज फ्रेम भेट दिली. आणि दोघांमध्ये राजकी चर्चा झाल्या आहेत. ममता यांनी सांगितले की ते आल्याबरोबर त्यांनी सिद्धविनायकचे दर्शन घेतले. उद्धव यांची प्रकृती लवकरात लवकर बरे व्हावे आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सक्रीय व्हावे यासाठी त्यांनी प्रर्थना घेल्याचे त्यांनी सांगितले.”


Next Story
Share it
Top
To Top