प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेतून मुंबईतील ८० सेवा सुविधा नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचे लोकार्पण वेळी ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, "कामे करतात परंतु दाखवत नाहीत, मग प्रश्न निर्माण होता की, जंगल में मोर नाचा किसने देखा' कौतुक करावं किंवा ते किती होईल म्हणून आपण काम करत नाही," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१३ जानेवारी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना परिस्थितीचा आढवा घेतला. परंतु, यावेळी उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.

"प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही," असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. "आपले कौतुक घरच्यांनी नव्हे तर कोर्टाने केले आहे. कौतुकासाठी नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कामे केली आहेत. नागरिकांनाचा जीव सुरक्षित राहिल याची काळजी घेतली पाहिजे. पालिकेवर काम करणारे किती काम करतात?, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला आहे. राज्यातील कोव्हिड सेटर्स लवकर बंद व्हावी, अशी माझी इच्छा आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (१४ जानेवारी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचे लोकार्पण केले. पालिकेच्या वतीने येणाऱ्या ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना देण्याचा मोबाईलवर 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "जरा कुठे खुट्टे झाले तर महापालिकेवर खापर फोडले जाते. तसेच महापालिका नगरसेवक आणि महापौर काय करतात? अशी दुषणे दिली जातात. कोणी कौतुक करावे, म्हणून आपण काम करत नाही, असे ते म्हणाले.
Next Story
Share it
Top
To Top