"एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?"- जयंत पाटील

एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?- जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली. तसेच देशमुख यांच्या मुलाला आणि सूनेला अटक वॉरंट बजावलं आहे. सीबीआयच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल केला आहे. जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

आज बंद असताना अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारण्यात आले

आज बंद असताना अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारण्यात आले. बंदकडून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी असे छापे मारले जातात. छापे मारुन किती वेळा मारणार, एकाच घरावर कितीवेळा छापे झाले? असा सवाल पाटील यांनी केला.दरम्यान, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने सकाळी 8 च्या सुमारास ही छापेमारी केली. सहा-सात अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपुरातील घरात प्रवेश करुन झाडाझडती सुरु केली. सीबीआयच्या धाडीननंतर देशमुखांच्या घराबाहेर तणावपूर्ण शांतता दिसत आहे. घराबाहेरील गेट बंद आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंग आणि 100 कोटी वसुली प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देशमुख यांच्या सूनेला आलेल्या अटक वॉरंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या


Next Story
Share it
Top
To Top