HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या… पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार

मुंबई | गेल्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज (१२ सप्टेंबर) गणेशभक्तांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. मात्र, गणेशभक्तांना बाप्पा पुढच्या वर्षी कधी येणार याचे वेध लागले आहे. भक्तांची हाक बाप्पाने ऐकली आहे. बाप्पा पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये गणपती बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत.

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा २२ ऑगस्ट २०२० मध्ये विराजमान होणार असल्याची माहिती अनेक पंचांगकर्त्यांनी दिली आहे. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी देणार आहे. दरम्यान सध्या मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पाहयला मिळत आहे. यंदा अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव, कृत्रिम तलावांजवळ उसळला आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळाल.

पाच वर्षांच्या बाप्पाच्या आगमनाच्या तारखा

  • २२ ऑगस्ट २०२०
  • ३१ ऑगस्ट २०२१
  • १९ सप्टेंबर २०२२
  • ७ सप्टेंबर २०२३
  • २७ ऑगस्ट २०२४

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…

News Desk

इंडियन आयडाॅलच्या स्पर्धकाला १ लाख ७० हजारांचा गंडा

News Desk

ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार बडजात्या यांचे निधन

News Desk