गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस

मुंबई | यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी (संघटित आरक्षण) संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधू शकतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.


Next Story
Share it
Top
To Top