जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | जुहू येथे राहणाऱ्या महिलेने भाजप आमदार अमित साटम यांचे नाव घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. महिला गेल्या अनेक वर्षांपासून जुहू परिसरात राहत आहे.महिलेने पोलिसांवर आणि भाजप आमदार अमित साटम यांच्यावर आरोप करत सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यात त्यांनी अनेक आरोप केलेत. सध्या महिलेवर कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी म्हटलं....

"आज मी आत्महत्या करतेय. पोलिसांनी मला खूप त्रास दिला. माझ्या मुलांचाही विचार केला नाही. त्यांच्यावर खोटी केस केली. मी विष पिऊन आत्महत्या करतेय. माझ्या मृत्यूला संजय कदम, अमित साटम जबाबदार आहेत. संध्याकाळपासून मी बसले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा" असे महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.


Next Story
Share it
Top
To Top