ममता बॅनर्जी मुंबईत पोहोचताच ​​​​​​​घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन!

ममता बॅनर्जी मुंबईत पोहोचताच ​​​​​​​घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन!

मुंबई। तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुंबई विमानतळावर उतरल्या आणि त्यांनी मुंबईत आल्यानंतर प्रथम सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. भेटीदरम्यान त्यांनी प्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. 26/11 च्या हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत.

जय मराठा.. जय बांगला…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “मागे जेव्हा मी मुंबईत आले होते तेव्हा इथे येण्यास जमलं नव्हतं. त्यामुळे मी यंदा दर्शनास जाण्याचं ठरवलं होतं. आमच्या घरी देखील गणपती पूजा होते. मी मंदिर समितीची, पुजाऱ्यांची आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे. मी सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. मला अतिशय छान वाटलं. इतक्या चांगल्याप्रकारे या लोकांनी मला दर्शन घडवण्यासाठी व्यवस्था केली. मी अतिशय आनंदी आहे, जय मराठा.. जय बांगला…

उद्या शरद पवार यांची भेट घेऊ शकतात

ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊ शकतात. यादरम्यान हे दोन्ही नेते अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. ममता बॅनर्जी 1 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन (वायपीओ) समिटमध्येही सहभागी होणार आहेत. यादरम्यान त्या उद्योगपतींसोबत बैठका घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार आहेत. वेळापत्रकानुसार ममता बॅनर्जी मुंबईत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून पूर्ण अंतर ठेवले आहे.


Next Story
Share it
Top
To Top