... लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

... लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

मुंबई | राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय बुधवारी (१२ जानेवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मराठी युवकांसाठी तुम्ही काय केले?, मराठी युवक नोकरीच्या शोधात देशभर फिरत आहेत, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले का?, तुम्ही लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात, असे सवाल उपस्थित करत जलीलांनी राज्य सरकारवर टीका केली.

जलील टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले, "दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि ते आता पाट्या कशा बदलणार, हा सर्वात मोठा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकारला जर खरेच मराठीवर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी टीव्ही चॅनलशी बोलताना केली. मराठी हक्कासाठी, महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद हे फक्त आपल्याला निवडणुकीच्या काळात ऐकायला मिळतात. आता निवडणूक आली आहे जर आपण जर मुद्दा नाही घेतला तर दुसरे हा मुद्दा घेतील. आणि दुसऱ्या कोणी हा मुद्दा उचला तर आपली फजिती होईल. आणि मला राज्य सरकारला प्रश्न विचारायचा आहे. मराठी सर्वांना येईलाच पाहिजे याला माझा विरोध नाही. मी स्वत: महाराष्ट्राच्या विधानसभेत उभे राहून मान्य केले होते. की, राज्यात प्रत्येक शाळा मग ती सीबीएससी असो किंवा कोणत्या बोर्डाचे असो मराठीही येईला पाहिजे. मग पाट्या लावून मराठीचा प्रचार आणि प्रसार हा तुम्ही कोणासाठी करत आहात. आज मराठी तरुण नोकरीसाठी संपूर्ण देशभर फिरत आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय केले का?, तुम्ही लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात."

"तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की, याच मराठी युवकांसाठी तुम्ही काय केले. त्यांच्या नोकरींच्या बाबतीत आज राज्यात इतकी बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्याकडे काम नाही, त्यांना खुशकरण्यासाठी राज्य सरकारकडे काही उपायोजना आहेत का?, तुम्ही मराठी आहात ना, मग मराठी मुलांसाठी ही योजना आहे की, जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कारोबार सुरू करा, तसले काही करायचे नाही हे असले फालतू धंदे म्हणजे तुम्ही काय साध्य करणार, हे फक्त राजकीय खेळी आहे. सरकारला असे वाटते की, लोक वेडे आहे. लोकांना काही कळत नाही, सोशल मीडियामुळे लोक इतके उशार झाले की, हे तुम्ही का करता आणि कशासाठी करतात. यामागचा तुमचा हेतू काय आहे?, असे जलील म्हणाले.

Next Story
Share it
Top
To Top