HW News Marathi
महाराष्ट्र

एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते ? तुमच्या घरी नाही?, राज ठाकरेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

मुंबई | “एकाच घरात राहून अजित पवार यांच्या घरी रेड पडते ? तुमच्या घरी रेड पडत नाही?,” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.  गुढी पाडव्याच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या,”लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटते.” यावर राज ठाकरेंनी आज (१२ एप्रिल) ठाण्यातील सभेतून सडेतोड उत्तर दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली.

“अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते.यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितले नाही की शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या. सुप्रिया सुळेंनी बोलायचे नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.”, असा टोला राज ठाकरेंनी त्यांच्या सभेतून लगावला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, “मलाच आश्चर्य या गोष्टीचे वाटते की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही, याचे कारण मला कळेल का?, असा सवाल त्यांनी सभेतून उपस्थित केला. येवढ्यावरच ते न थांबता पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात. आणि पुढच्या माणूस सांगायला देशमुख गेले. मग, पवारसाहेब परत एक भेट घेतली की, मग अजितचे काय? मग रेड टाकल्या. यानंतर पर पंतप्रधानांची भेट घेतली आणि नवाब मलिक फाजीलपणा करतोय. यानंतर मग नवाब मलिक. आता संजय राऊतांसदर्भात बोलत आहेत. आता यावर काय बोलायचे माहिती नाही. मी पवारांच्या वाढदिवसाच्या वेळी भाषण दिले, तेव्हा म्हणे शरद पवार खूश झाले होते. मला भीती वाटली, आज शरद पवार राऊतांव खूश आहेत म्हणे, ते कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. अनेक काँग्रेसवाल्याना हे उशिरा काळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

मलिकांच्या प्रकरणांचं सर्व पुरावे शरद पवारांकडे देणार!; फडणवीसांचा इशारा

Gauri Tilekar

राष्ट्रवादीचे गुंड सोमय्यांना धमक्या देतायत, केसाला धक्का लावाल तर…!

News Desk