HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंनी काल (३ मे) औरंगाबादमधील सभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नेय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी कालपासून मनसैनिकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज दुपारी १ वाजात पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे. 

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यांवर मनसे आजपासून आंदोलन करण्यास करण्यास राज ठाकरेंनी काल ट्वीट करून पत्रक टाकले. पत्रातून मशिंदीसमोर हनुमान चालिसा लावाली, असे आवाहन केले होती. यानंतर मनसे आज (४ मे) पहाटेपासून मुंबईतील चार कोप येथे मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली तर कल्याणमध्ये भोंग्या विना म काही ठिकाणी मशिदीसमोर मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.   राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत सरकारला अल्टिमेटम दिला होता.  

राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ आज सकाळी ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणाले, “ज्या दिवशी माझे सरकार महाराष्ट्रात येईल. त्यावेळी रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदु धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्यांनी मला सांगावे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करायाल तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरील खाली येतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘पुन:श्च हरीओम’, ‘मिशिन बिगिन अगेन’ घोषणामुळे गोंधळ वाढला। देवेंद्र फडणवीस

News Desk

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे थेट तळीयेत…..!

News Desk

काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!

News Desk