"मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे!" - सामना

मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे! - सामना

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या महाराष्ट्राचा दौरावर येवून गेल्या आहेत. “भाजपविरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे असून फॅसिस्टविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे." असे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. यूपीएबद्द पत्रकारांनी प्रश्न विचरल्यावर बॅनर्जी म्हणाले, “काय आहे यूपीए, आता यूपीए नाह," या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखात म्हणाले, "मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे."

"भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत," असे म्हणत सामनातून बॅनर्जींवरी टीका केली आहे.

विरोधकांना यूपीएची गरज आहे

अग्रलेखात म्हणाले, "मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे 'यूपीए'चे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे."

'यूपीए' नसेल तर दुसरे काय?

"यूपीएचे नेतृत्व कोणी करावे हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. 'यूपीए' नसेल तर दुसरे काय? या चर्चेतच वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन 'यूपीए'च्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. एनडीए किंवा यूपीए या आघाडय़ा अनेक पक्षांच्या एकत्र येण्याने उभ्या राहिल्या. ज्यांना दिल्लीतील सध्याची राजकीय व्यवस्था खरोखर नको आहे, त्यांनी 'यूपीए'चे मजबुतीकरण हेच लक्ष्य ठेवले पाहिजे. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत ते ठेवूनही 'यूपीए'ची गाडी पुढे ढकलता येईल," असे समानाच्या अग्रलेखात म्हटले आहे.


Next Story
Share it
Top
To Top