ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

मुंबई। एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक संपल्यावर माध्यमांशी बोलताना दिली. परबांनी आज (२३ नोव्हेंबर) सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण चर्चा पार पडली.

आज झालेल्या या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना परबांकडून अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आला. सरकारच्या या प्रश्नावर एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुढील पाऊल स्पष्ट करण्यात येणार असल्याचे पडळकर आणि खोतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विलीनीकरण करणारा मुद्दा कोर्टात

पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा झाल्या परब म्हणाले, "एसटी विलीनीकरण करणारा मुद्दा हा कोर्टात आहे. यामुळे सरकार यावर निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाकडून नेमलेल्या समितीने १२ आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल," असे परब म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप थांबवण्यासाठी

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

एसटी संपावर लवकरच तोडगा निघेल - राऊत

“एसटीचा विषय हा गंभीर आहे. असे जर तुम्हाला वाटत असेल. तरी मला खातरी आहे. लवकरच तो विषय सुटेल. शरद पवारांनी एसटी आंदोलनासंदर्भात त्यांची काही भूमिका आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांशी काल चर्चा केली. पवारांनी एसटी आंदोलनासंदर्भात त्यांच्या बोलण्यातून मला असे वाटते की, काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे राऊतांनी पवार यांच्याशी वाय. बी. सेंटरमध्ये बैठकीतनंतर माध्यमांना सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top