परळीत मुंडे बहीण भाऊ एकच!; काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा गंभीर आरोप

परळीत मुंडे बहीण भाऊ एकच!; काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा गंभीर आरोप

बीड | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ह्या काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत आणि याच धर्तीवर काँग्रेस आय ही स्वातंत्र्य निवडणुका लढवणार असल्याचे परळी शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष बहादुर भाई यांनी सांगितले होते. या अनुशंगाने परळीत काँग्रेस आयच्या वतीने आज (१३ मे) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस आयचे शहर अध्यक्ष बहादुर भाई म्हणाले की, सध्या परळी शहरामध्ये काँग्रेस आयला कमजोर करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस च्या मार्फत केले जात असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना बहादुर भाई यांनी यावेळी केले आहे. तर परळीत मुंडे बहीण भाऊ एकच असून ते एकमेकांना सपोर्ट करत आहेत. जनतेला ते ठगवायचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

तर परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली हुकूमशाही सुरू केली आहे आणि त्यांनी स्थानिक लोकांवर दबावगट निर्माण केला आहे, असेही ते या वेळी म्हणाले. तर पालकमंत्री धनंजय मुंडे हे भलेही राष्ट्रवादीत असले तरी ते ज्या पक्षातून आले आहेत तो भाजपा याच भाजपच्या कूट नितीवर सध्या बीडमध्ये राजकारण सुरू असल्याचाही आरोप यावेळी बोलतांना बहादुर भाई यांनी केला. आम्ही काही दिवसांपूर्वी परळी तहसीलच्या ढिसाळ कारभारात कंटाळून बेशर्म देऊन आंदोलन केले आणि आम्हाला व आमच्या कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या गेले. तसेच ज्या लोकांचा काहीच संबंध नाही अश्या मुलांवर देखील 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व मनमानी कारभार सध्या सुरू असून आम्हाला दाबण्याचे काम सध्या सुरू आहे, असे पत्रकार परिषदेत बोलताना बहादुर भाई म्हणाले.


तर परळी नगर परिषदेमार्फत खुप मोठा भ्रष्टचार बोकाळला आहे जे काम झाले आहे त्या कामावर 3 करोड 84 लाखाचे परत टेंडर काढले जात असल्याचाही आरोप यावेळो वेळी करण्यात आला. "याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे,खोट्या केस आमच्यावर करणार म्हणून आम्ही तुम्हला भेत नाहीत उलट जास्त ताकदीने आम्ही याचा विरोध करणार आणि आगामी नगरपालिका निवडणूक परळीच्या प्रत्येक वार्डातून आम्ही लढवणार", असं बहादूर भाई यांनी म्हटले आहे.

यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी समंदर खान, उपाध्यक्ष सरचिटणीस शिवाजी देशमुख, प्रवक्ते बदर भाई, परळी विधानसभा युवक अध्यक्ष रणजित देशमुख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सिकंदर भाई, मागासवर्गीय अध्यक्ष दिपक शिरसाट, जो काँग्रेस उपाध्यक्ष शेख अलीम, सीएम उर्फ शेख मेहबूब चाँद यांच्यासह इतर ज्येष्ठ मंडळी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


Next Story
Share it
Top
To Top