‘महाराष्ट्रातील लोक तंबाखू समजून गांजा तर खात नसतील?’- नवाब मलिक झाले ट्रोल

‘महाराष्ट्रातील लोक तंबाखू समजून गांजा तर खात नसतील?’- नवाब मलिक झाले ट्रोल

मुंबई | अभिनेती रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि तंबाखू (टोबॅको) यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हटलं. मात्र नवाब मलिक यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मिम्स आणि मजेदार कमेंट्सचा पाऊस पडल्याचं चित्र दिसत आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गांजा आणि तंबाखूसंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चेत

याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गांजा आणि तंबाखूसंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चेत आहे. दिनांक ९ जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून मोबाईल नंबरवरुन पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते. या फोटो आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर मिडियाने बातम्या दिल्या. शेवटी कुणीही कितीही बातमी पेरली तरी त्याची खातरजमा पत्रकारांनी केली पाहिजे,” असे आवाहनही नवाब मलिक यांनी माध्यमांना केले.

“१४ जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले की, मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी खोटे दावे करुन करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले. “करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना अडकवण्यात आलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top