कर्जत नगरपंचयात निवडणुकीत रोहित पवारांचे वर्चस्व; १७ पैकी १२ जागांवर विजयी

कर्जत नगरपंचयात निवडणुकीत रोहित पवारांचे वर्चस्व; १७ पैकी १२ जागांवर विजयी

मुंबई | कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात १७ पैकी १२ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपने दोन जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत नगरपंचायतमध्ये रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्या पुन्हा एकदा खडाजंगी पहायला मिळाली. कर्जत नगरपंचायतीत काल (१८ जानेवारी) मतदान पार पडले. कर्जत नगरपंचायतमध्ये एकूण ८०.२१ टक्के मतदान झाले.

नगरपंचयातीला आज (१९ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. कर्जत नगरपंचायतीला हळूहळू निकाल येण्यास सुरुवात झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. यानंतर १७ पैकी १२ जागांवर विजयी मिळवून राष्ट्रवादीने एक हाती सत्ता काबजी केली आहे. कर्जत नगरपंचयातमध्ये १७ जागा असून यात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर फक्त १३ जागांवर मतदान २२ डिसेंबरला झाले असून उर्वरित ४ जागांवर काल (१८ जानेवारी) मतदान झाले. १३ जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून अर्ज मागे घेण्यात आला

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर नगरपंचायंती खुल्या झालेल्या जागांवर मतदान झाले होते. याव्यतिरिक्त भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३, पंचायत समित्यांच्या ४५ जागा, नगरपंचायत १०६ पैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जीगीसाठी काल (१८ जानेवारी) मतदान झाले होते आणि आज या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

कर्जत नगरपंयातीचे निकाल

राष्ट्रवादी- १२

भाजप- २

काँग्रेस- ३

Next Story
Share it
Top
To Top