मुंबै बँकेवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व संपुष्ठात; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष

मुंबै बँकेवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व संपुष्ठात; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष

मुंबई | मुंबै बँकेवरील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपुष्ठात आले आहे. आणि आता मुंबै बँक अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांना विजय मिळाला आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती झाली आहे. यात सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळवून विजय, भाजपचे प्रसाद लाड यांना ९ मते आणि उपाध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली आहेत.

मुंबै बँकेत दरेकरांनी एकूण २१ जागांपैकी २१ जागांवर निर्विवाद विजय मिळाला होता. परंतु सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र ठरवल्यानंतर दरेकरांना मोठा धक्का बसला होता. यामुळे दरेकरांची मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदापासून दूर रहावे लागेल. बँकेच्या निवडणुकीपूर्वी आज (१३ जानेवारी) सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली.

मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले असून त्यांना कामाचा अनुभव देखील आहे. तसेच मुंबईचे एक वर्षांचे अध्यक्ष पद हे एका वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top