'ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं'; भाजप आक्रमक तर पटोलेंनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; भाजप आक्रमक तर पटोलेंनी दिलं हे स्पष्टीकरण

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो', असं वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलेलं पहायला मिळालं. यावरून त्यांच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं, निदर्शनं करण्यात आली. मात्र, हा वाद शमत नाही तोच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं', असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.


नाशिकमधील इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्यानंतर पटोलेंनी पत्रकारांशी संवाद झाला. यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, "माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी पडलं, असं त्या गावगुंडानेच सांगितलं आहे. मात्र, भाजप नेते त्याच वाक्याला घेऊन बसले आहेत आणि पंतप्रधानांची बदनामी करत आहेत. गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झाली आहे. लोकं भाजपवर हसतात. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरतं, असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिलंय", असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलंय.पटोले हे 'महाराष्ट्राचे पप्पू' - मुनगंटीवार


यानंतर पुन्हा भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पत्नीविषयी पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आज भाजपच्या नेत्यांकडून त्यांचा निषेध केला जात आहे. पुणे, मुंबईत भाजप कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर नाना पटोले यांनी मोदींबद्दल जे उद्घार काढले आणि नंतर जी सारवासारव केली हा एक राजकीय तमाशा असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी पटोलेंना 'महाराष्ट्राचे पप्पू' असं म्हणून टीका केली आहे.


पटोलेंचं स्पष्टीकरण


दरम्यान, पटोलेंनी यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीविषयी केलेल्या वक्तव्याचं आता स्पष्टीकरणही दिलं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाही, तर एका गावगुंडाबाबत बोललो होतो हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानपदाचा सन्मान आम्हाला माहिती आहे. पण भाजपाचे लोक एका गावगुंडाचं इतकं समर्थन का करत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. तर पटोलेंच्या निषेधार्थ काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले, त्यावरून ते म्हणाले की "जर पुतळे जाळायचेच असतील तर 'भारतमाता की जय' असं म्हणून देश विकू पाहतात त्यांचे जाळा, 'बेटी बचाव, बेटी पटाओ' असं म्हणणाऱ्यांचे जाळा, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात जाळा," असंही पटोले म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top