HW News Marathi
महाराष्ट्र

“… म्हणून कोणीला वाघ होता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई। वाघाचे फोटो काढले म्हणून कोणाला वाघ होता येत नाही, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. फडणवीसांनी काल (१५ मे) गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित सभेतून उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. या सभेत फडणवीसांनी विविध मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

फडणवीस म्हणाले, “वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. फक्त फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही. “

आता वाघ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी

“होय, बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, पण आता देशात एकच वाघ आहे. आणि तो वाघ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार मंदिरात घंट वाजवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बनवणारा हिंदू पाहिजे. तर अतिरेक्यांना बनवणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. देशाच्या जवानावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी सीमापार जावून सर्जिकल स्टाईल केली, ” असे फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण

News Desk

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

News Desk