HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत सांकेलीम मतदारसंघातून 300 मतांनी आघाडीवर

मुंबई | गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सांकेलीमचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंंत हे दुसऱ्या फेरीत ३०० मतांनी आघाडीवर आहे. तर पहिल्या फेरीत ४०० मतांनी पिछाडीवर आहे. सुरुवातीच्या दुसऱ्या ट्रेंडनुसार, गोव्यात सध्या भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १३ , महाराष्ट्रवादी गोमंतक-५, आम आदमी पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे. तसेच सुरुवातीच्या पहिल्या ट्रेंडनुसार, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १३ जागा आल्या आहेत. आता गोव्यात भाजप दोन जागांनी पिछाडीवर आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतमोजणीपूर्वी श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर हे पहिल्या फेरीत ७०४ मतांनी पिछाडीवर आहे. तर भाजपने उत्पल परिकर यांना पणजीमधून तिकीट न दिल्यामुळे ते अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढवत आहेत. गोव्यात १४ फेब्रुवारीला ४० जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी झाले होते. एक्झिट पोलनुसार गोव्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे दिसत होते. गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहे. यापूर्वी गोव्यात भाजपला १७ आमदार, काँग्रेसचे १३ आमदार आले आहेत. मगोपचे 3 आणि गोवा फॉरवर्डचे 3 आमदार होते. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांनी राजीनामा दिले होते 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आणखी एक मंत्री सेल्फ क्वारंटाईन! खबरदारी म्हणून घेतला निर्णय

News Desk

मुख्यमंत्री आज जाणार अण्णांच्या भेटीला

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घरी बाप्‍पाचे आगमन

Aprna