"हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला!" फडणवीसांची मागणी

हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला! फडणवीसांची मागणी

मुंबई | रझा अकादमी कुणाची बी टीम आहे. हे सर्वांना माहीत आहे. रझा अकादमीवर बंदी घाला, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच अकादमीवर बंदी घालायची हिंमत आहे का?, असा सवालही फडणवीसांनी काल (२१ नोव्हेंबर) अमरावती घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारला केला आहे.

दरम्यान, रझा अकादमी काँग्रेसच्या काळात पोलिसांवर हल्ले का करते ?, मुंबईत देखील अशा प्रकराची दंगल झाली होती. जेव्हा रझा अकादमीनं पोलिसांवर हल्ले केले होतं. तेव्हा काँग्रेसचंच सरकार होतं. त्यामुळे अकादमी कुणाची बी टीम आहे. हे सर्वांना माहीत आहे. रझा अकादमीवर बंदी घाला, त्यांच्यावर बंदी घालण्याची हिम्मत आहे का ?, असा सवाल करत फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे

“राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं,” असा फडणवीसांनी उपस्थित केला आहे. “या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे कोणी काढलं. या मागची भूमिका काय होती?, ” यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

१३ तारखेला जी घडना घडली, ती १२ तारखेच्या घटनंची प्रतिक्रिया

नांदेड, मालेगाव, अमरावती किंवा राज्यातील इतर भाग असेल एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघालं. सर्वत पहिल्यांदा तर यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. “१३ तारखेला जी घटना घडली, ती १२ तारखेच्या घटनंची प्रतिक्रिया होती. १३ तारखेला जी काही हिंसा झाली. त्यांचे समर्थन मी करणार नाही. कोणत्याच हिंसेचे समर्थन केले जावू शकत नाही. हे सांगण्याचं कारण या करिता आहेत. आता राज्य सरकार, सरकारमधील अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री हे सगळे १२ तारखेची घटना डिलीट करून जनू १३ तारखेची घटनेबद्दल बोलत आहेत,” असा आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top