HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये जमावबंदीत शाही पार्टीची दावत; नियमांना हरताळ!

बीड | बीड शहरात पुन्हा एकदा कोरोना नियमांना हरताळ फासत, लहान मुलं-महिलांसह शेकडोंच्या उपस्थितीत शाही पार्टीची दावत करण्यात आली. शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये पटेल कुटुंबियांकडून दावत देत या शाही पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जेवढे लहान मुलं होते, तेवढ्याच प्रमाणात महिला व पुरुषांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या शाही पार्टीला शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी अन प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होते. तर यापैकी अनेकांच्या तोंडाला मास्क देखील नव्हते.

तर यादरम्यान तहसील प्रशासनाची गाडी देखील आली होती. यामध्ये ३ पोलीस कर्मचारी, तलाठी आणि नगर पालिका कर्मचारी होते. यावेळी त्यांनी फोटोग्राफ देखील काढले. मात्र, आयोजक हे राजकीय असल्याने १ हजार रुपये पावती फाडा, असं म्हणत आयोजकांनी अनेकांना फोन फिरवला. अखेर थातूरमातूर दंडात्मक कारवाई करत गाडीतून आलेल्या कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.

दंड भरा नावाला अन् संसर्ग करा सर्वाला

एकीकडे राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसमारंभाला केवळ ५० व्यक्तींच्या उपसस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. त्यावर कोणी असेल तर प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये दंड आहे. मग या तहसीलदारांच्या गाडीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर कारवाई कुणाच्या सांगण्यावरून केली ? सामान्यांना एक न्याय आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या व्यक्तींना एक न्याय का ? असा सवाल उपस्थित केला जात असून “दंड भरा नावाला अन संसर्ग करा सर्वाला” जणू काही असाच नियम नियम बीडमध्ये सुरुय का ? असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश | पांडुरंग बरोरा

News Desk

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

News Desk

एक दिवस आपला मेळावा शिवतिर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही – पंकजा मुंडे

News Desk