HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

बीड | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने दिला आहे. २२ ऑक्टोबर २००८ रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक करून बसचे समोरील काच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व त्यास राज उर्फ स्वराज श्रीकांत ठाकरे यांनी चेथावणी दिली. वगैरे मजकुरावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं २०८/२००८अन्वये गुन्हा कलम १४३, ४२७, ३३६,१०९ भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असून राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे/पावडे यांनी दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्‍टोबर २००८मध्ये अटक करण्यात आले होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात अनेक ठिकाणी दिसून आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळीमधील धर्मापुरी पॉईंट येथेसुद्धा एसटी बसेसवर दगडफेक झाली होती. यात सार्वजिनक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर जमावबंदीचे आदेश मोडणे आणि चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल झाले होते.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर, तीन दिवस सुरु रहाणार संप

News Desk

केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, छापेमारीला सुरुवात ….

News Desk

देश हादरवण्याचा कट, सातवी कारवाई, जोगेश्वरीतून आणखी एकाला उचलला!

News Desk