डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज (२४ जून) फेटाळून लावला आहे. या डॉक्टरांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नायर रुग्णालयातील डॉ. पायल हिच्या त्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली होती.

या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जाला राज्य सरकारकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यात असल्यानं सद्य परिस्थितीत आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

डॉ. पायल तडवीने नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यामुळे पोलिसांनी नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे.


Next Story
Share it
Top
To Top