औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

नवी दिल्ली | औरंगाबाद येथे आज (८ मे) पहाटे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाला. या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या १६ मजुरांचा मालगाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर, काही मजूर जखमी झाले आहेत. हे मजूर कर्माजवळ रेल्वे रुळावर झोपले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आपण या दुर्घटनेबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून त्यांना तेथील स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पीडितांना तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1258597915536179201?s=20


Next Story
Share it
Top
To Top