बीड | पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे, अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केलं ? असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा...असा थेट आव्हानरुपी घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे.
तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे.माझे वय 60 वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गॅंग झाली आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.