अजब दावा... खेकड्यांमूळे फुटले धरण

अजब दावा... खेकड्यांमूळे फुटले धरण

मुंबई l रत्नागिरी जिल्हातील तिवरे धरण फुटल्याचा फटका येथील ७ गावांना बसला. वित्तहानी तर झालीच पण जीवीतहानीही मोठी झाली आहे. आतापर्यंत १८ मृतदेह हाती आले असून अजून ४ जणांचा शोध सुरू आहे. या धरणाच्या पाण्यात येथील शेकडो संसार वाहून गेले. एका रात्रीत होत्याचे नव्हत झाल्याचे दुख येथील नागरीक बोलून दाखवतायत. मात्र, नेते मंडळींना या दुखाच काहीही सोयरसुतके नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वीच या धरणाला तडा गेल्या असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याकडे जर लक्ष देवून वेळीच योग्य ती खबरदारी घेतली असती तर आज अनेक लोकांचे प्राण वाचले असते. मात्र जे व्हायला नको तेच झाले.

अशातच तिवरे धरणात खेकड्यांची संख्या मोठी आहे. त्यांची फार मोठी अडचण आहे आणि त्यामुळेच या धरणाला गळती लागून धरण फुटले असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. याचबरोबर या प्रकरणात शिवसेनेच्या आमदाराला दोषी ठरवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच २००२ ला हे धरण बांधून पुर्ण झाले. गेल्या १५ वर्षात या धरणाला काहीही झाले नाही. मात्र गेल्या काही दिवसांत येथे खेकडयांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. यामुळेच धरणाला गळती लागली आणि ते फुटले. सावंत यांनी गुरुवारी (४ जुलै) हा दावा केला आहे. यावरुन लक्षात येते की, धरण का फुटले याची कारणमीमांसा न करता हे नेते आपल्याच मानाचे तारे तोडत आहे.

धरण फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सुद्धा या कामात कुचराइ झाल्याची शंका व्यक्त करत या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तर तानाजी सावंत यांच्या या दाव्याचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जर उंदिर आणि खेकडे यासाठी जबाबदार असतील तर मग तुम्ही मंत्रीपद का घेतले असा सवाल पवारांनी केला आहे. सराकारच्या निष्क्रीयतेचे खापर प्राण्यांवर का फोडत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे


Next Story
Share it
Top
To Top