आनंदराव अडसूळांकडे १ हजार कोटीपेक्षा जास्त अवैध संपत्ती! रवी राणांचा गंभीर आरोप

आनंदराव अडसूळांकडे १ हजार कोटीपेक्षा जास्त अवैध संपत्ती! रवी राणांचा गंभीर आरोप

मुंबई | मुंबई सिटी बँक मध्ये शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी घोटाळा केला अशी तक्रार बडनेराचे आमदार रवी राणा यांनी ईडी कडे केली होती, त्यामुळे ईडीने आनंदराव अडसूळांना नोटीस देत अडसूळांच्या घरी छापे टाकले होते मात्र ईडीच्या कारवाई दरम्यान आनंदराव अडसूळांची प्रकृती बिघडली व ते रुग्णालयात दाखल झाले व नंतर आनंदराव अडसूळांनी ईडी कारवाई विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली, या याचिकेवर मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी होणार असून यात आनंदराव अडसूळांना दिलासा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.

हॉस्पिटलचा सहारा अडसूळ घेत आहे तर अडसूळ यांनी ईडीला व न्यायालयाला तपासात सहकार्य करावे

अडसूळांनी विदेशात सुद्धा बेनामी अवैध संपत्ती जमा केली व १ हजार करोड पेक्षा आनंदराव अडसूळ यांच्याकडे अवैध संपत्ती आहे अशी खळबळजनक माहिती आमदार रवी राणा यांनी दिली तर हॉस्पिटलचा सहारा अडसूळ घेत आहे तर अडसूळ यांनी ईडीला व न्यायालयाला तपासात सहकार्य करावे अस रवी राणा यांनी सांगितले


Next Story
Share it
Top
To Top