मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांची टीका!

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांची टीका!

मुंबई। मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने हाताशी आलेली पीके गेली. तसेच शेतजमीनी देखील नापीक झाल्या आहेत. जलुयक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूर आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु जलयुक्त योजनेमुळे पूर आल्याचा दावा हास्यस्पद असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जलयुक्त शिवार योजनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. चंद्रकांत पाटील यांनी यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यातील लोकांना चांगला फायदा झाला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जलयुक्त शिवाराच्या बांधकामामुळे पूर आला असे म्हणणे हास्यास्पद

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जलशिवार योजनेच्या तांत्रिक अडचणींमुळे मराठवाड्या पूर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. जलशिवाराच्या तांत्रिक अडचणींमुळे झालं नाही तर महापुराचा परिणाम हा पावसामुळे झाला आहे. जलयुक्त शिवाराची झालेली कामे ही किती उपयोगी आहेत. पाण्याचा कसा साठा होत आहे. त्या पाण्याचा वापर कसा होणार आहे हे सिद्ध झालं आहे. परंतु जलयुक्त शिवाराच्या बांधकामामुळे पूर आला असे म्हणणे हास्यास्पद असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, नदी पात्रातील बांधकाम हा महाराष्ट्रातील सर्वोदूर प्रश्न आहे. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी सोडल्यामुळे नदी पात्रातील फुगवटा पात्राच्या वर आला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली. तसेच मराठवाड्यातील पुराचे कारण काय आहे? याबाबत मराठा विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठाने अभ्यास करायला हवा. जलयुक्त शिवारावर टीका झाली पण लोकांना या योजनेचा फायदा झाला असून त्यांचा पाण्याचाप्रश्न मिटला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

जलयुक्त योजना ही लोकउपयोगी आणि सकारात्मक योजना होती

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, जलयुक्त योजनेतील सगळीच कामे चुकीची झाली असतील असे नाही त्यातील काही कामे झाली असतील. जलयुक्त योजना ही लोकउपयोगी आणि सकारात्मक योजना होती. मराठवाडा विदर्भातील जलयुक्त योजनेत निर्माण करण्यात आलेल्या पात्राच्या बाहेर पाणी आलं आहे. काही ठिकाणी पाणी स्वतःचे पात्र सोडून तीन किलोमीटरपर्यंत पसरलं असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


Next Story
Share it
Top
To Top