सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा....

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा....

मुंबई | 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नुकतीच दोन आरोपपत्रं विशेष न्यायालयात दाखल केलेली आहेत. ही दोन्ही आरोपपत्र अनिल देशमुख यांचे खाजगी आणि शासकीय पी ए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात दाखल केलेली आहेत. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझे याला 16 पैशांनी भरलेले या बॅगा द्यायला सांगितले होते आणि हे पैसे सचिन वाझे याने कुंदन शिंदे याला दोन वेळा दिले होते, असा धक्कादायक खुलासा या आरोपपत्रातून जाला आहे.

ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल

तर सचिन वाझे याने सीआययु म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिट या युनिटचा पदभार स्वीकारल्यानंतर ऑर्केस्ट्रा आणि बार ओनर्सना त्यांचे बार सुरळीत चालावे याकरता 4 कोटी 70 लाख रुपये मागितले होते आणि ते त्याने गोळा करूनही दिले होते, हे सर्व पैसे सचिन वाझे याने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्यामार्फत किंवा याच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस बाहेर आणि दुसऱ्यांदा राजभवनाजवळ 4 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 म्हणजेच याच वर्षी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते. मुंबई पोलिसांच्या झोन 1 आणि झोन 7 या दोन झोनमधून हे पैसे गोळा करण्यात आले होते. म्हणजेच साऊथ मुंबई आणि मुंबई उपनगर या भागातून ते पैसे गोळा करण्यात आले होते.

रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, व्ही ए रियल कोन प्रायव्हेट लिमिटेड, उत्सव सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि शिताल लिजिंग अंड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवले होते. नंतर हीच रक्कम विविध बँकांतून श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेच्या खात्यात वळते करण्यात आले होते.


Next Story
Share it
Top
To Top