सांगली | सांगलीमध्ये कोरोनारूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं असून आज एकाचं दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल २३ वर जाऊन पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यांमध्ये २३ मार्चला एकाचं कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाली.सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकतेचं प्रवास करून परतले होते.
२३ तारखेनंतर २५ तारखेला त्याचं कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आणि काल त्यांच्या संपर्कातील २ जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे आता सांगलीमध्ये तब्बल २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील कोरोनारूग्णांची संख्या आता १४७ झाली आहे.