शरद पवारांची प्रकृती उत्तम; नवाब मलिक यांची माहिती

शरद पवारांची प्रकृती उत्तम; नवाब मलिक यांची माहिती

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. तर त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि बारामतीमध्ये उपस्थिती लावली होती. यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते होम क्वारंटाईन असून त्यांची प्रकृती बरी आहे", अशी माहिती मलिक यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच ते म्हणाले की डॉक्टरांच्या सल्ल्याने पवारसाहेब आपल्या घरीच उपचार घेत आहेत. गेल्या २ - ३ दिवसात पवारांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी, असे आवाहन स्वतः शरद पवारांनी केले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, पुढील ७ दिवसाचे शरद पवारांचे जे कार्यक्रम होणार होते ते आता पवार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत. पवारांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा नियोजित कार्यक्रम होतील, असेही नवाब मलिकांनी यावेळी सांगितले आहे.


Next Story
Share it
Top
To Top