शरद पवार देणार तिवरे गावाला भेट

शरद पवार देणार तिवरे गावाला भेट

मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि येथील ७ गावांना त्याचा फटका बसला. दुर्घटना ३ जुलै रोजी रात्री हे धरण फुटून एकच हाहाकार माजला. या दुर्घटनेत वाहुन गेलेल्या येथील नागरीकांचा अजूनही शोध सुरुच आहे. तर या दुर्घटने प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी ८ जुलै रोजी भेट देऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तिवरे धरण फुटल्यामुळे येथील २४ जण त्यामध्ये वाहुन गेले. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. यादुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण जबाबदार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. शरद पवार ७ आणि ८ जुलै रोजी पुणे, सातारा आणि रत्नागिरि जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते पुण्यातील साखर कारखान्याच्या सेमीनारला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानंतर ते तिवरे गावाला जाउन तेथील मृतांच्या परीवारांना भेटणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top