आमदार विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण

आमदार विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण

बीड | राज्यातील बीड जिल्ह्यातील शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेटेंनी स्वतःहून फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तसेच मेटेंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यासह देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ओमिक्रॉन असे नाव असून देशातील कर्नाटकात २ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहे. यामुळे राज्यातील विमान प्रवासावर निर्बंध आणली गेली आहेत.

मेटेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, "कोरोना कालावधीमध्ये मागील दोन वर्षांपासून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु शुक्रवारी सकाळी माझी आर.टी.पी.सी.आर. टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. माझी तब्येत चांगली आहे.काळजी नसावी. परंतु, मी कोरोना पॉझिटिव झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातूनही लवकरच बाहेर पडेन."


Next Story
Share it
Top
To Top