शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते, अन् उद्योग बंगालला पाठवते!

शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते, अन् उद्योग बंगालला पाठवते!

मुंबई | शिवसेना इथल्या तरुणांना वडापाव विकायला लावत आहे. आणि राज्यातील उद्योजकांना तुम्ही बंगालला पाठवणार का? तुमची भूमिका स्पष्ट करा, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारला आहे. तसेच बॅनर्जींनी राज्यातील उद्योजकांना त्या बंगालमध्ये निमंत्रण द्यायला आल्यात, असा आरोपही शेलारांनी दिला आहे. शेलारांनी आज (१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर अनेक सवाल उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शेलारांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, "ममतांना जय हिंदूराष्ट्र मान्य नसल्यास सेनेची भूमिका काय ?, बांग्लादेशी समर्थकांशी तुमचे नाते काय?, ममता बनर्जी यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता का पाळली ? गुप्त बैठका घेऊन सर्व उद्योगांना बंगालला पाठवत आहेत का?,ममतांना जय हिंदूराष्ट्र मान्य नसल्यास सेनेची भूमिका काय ?, गुप्त बैठकीत दहशतीच कटकारस्थान झाल्याचा भाजपचा आरोप ?, मंत्र्यासोबत बैठक शासकीय स्तरावर झालेली नसून या बैठकीत नेमके काय झाले हे अद्याप अस्पष्ट नाही, असे अनेक सवाल शेलारांनी बॅनर्जीच्या दौऱ्यावर सरकारवर केले आहे.

त्रिपुरात तुमच्या वाघीणाला खारू ताई केले आहे

त्रिपुराच्या निवडणुकीत बॅनर्जीचा परावभ झाला आहे. या पराभवानंतर शिवसैनिक आणि ममता सैनिकांनी सर्वजनिक रडण्याचा कार्यक्रम ठेवावा. त्रिपुराच्या लोकांनी तुमच्या वाघीणाला खारू ताई केले आहे, असा टोलाही शेलारांनी ममतांना लगावल आहे. तसेच संजय राऊतांनी त्रिपुरात जावून प्रचार करावा आणि राऊतांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही, अशा शब्दात राऊतांवर टीका केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top