इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले...!

इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले...!

मुंबई | इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे चैलेंज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना दिले आहे. ठाण्यामधील पोखरण रोडमध्ये सरनाईकांनी 'छाबय्या विहंग गार्डन' या गृहसंकुलातील अनधिकृत इमातर बांधली. या ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आले. यामुळे सरनाईकांना ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. यानंतर सरनाईक आज (१४ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.

सरनाईक म्हणाले, "ठाणे पालिकेच्या तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सुडबुद्धीने 'छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरविल्याचा आरोप त्यांनी केला. राजीवांनी इमारतीची जी मंजूर फाईल होती, त्यावर त्यांनी अनधिकृत ठरविले. जर इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे खुले चैलज त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

विहान कंस्ट्रक्शन ही माझी कंपनी १९८९ साल सुरू करण्यात आली. १९९७ मध्ये मी नगरसेवक आणि २००९ मध्ये आमदार झालो आहे. मी सर्वप्रमथ एक व्यावसायिक म्हणून उदयास आल्यानंतर मी राजकारणात आलो. मी मराठी व्यवसायकि आहे म्हणून दिसतो का?, मग हिरानंदानी आणि लोढा यांचे नावे का घेतली जात नाही? आणि त्यांना का दंड ठोठावला जात नाही?, असे अनेक सवाल सरनाईकांनी विरोधकांना विचारले आहेत.

Next Story
Share it
Top
To Top