"भाजपचे बेगडी मुंबई प्रेम!", राऊतांची भाजपवर टीका

भाजपचे बेगडी मुंबई प्रेम!, राऊतांची भाजपवर टीका

मुंबई | शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते. आणि राज्यातील उद्योजकांना तुम्ही बंगालला पाठवणार का? तुमची भूमिका स्पष्ट करा, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. राऊतांनी वृत्त पत्रात 'व्हायब्रंट गुजरात'ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्वीट केली. "भाजपचे बेगडी मुंबई प्रेम," असे म्हणत भाजपवर निशाना साधला आहे.

राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, "भाजपचे बेगडी मुंबई प्रेम. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय.आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून."

https://twitter.com/rautsanjay61/status/1466247092184117254?s=20

मुंबईतून international finance centre गुजरातला पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? योगी आदित्यनाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करीत आहेत.. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या खाली किती टाके पडले आहेत ते पहा, असे राऊतांनी दुसरे ट्वीट केले आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1466250058207141888?s=20

आशिष शेलार नेमके काय म्हणाले

शिवसेना इथल्या तरुणांना वडापाव विकायला लावत आहे. आणि राज्यातील उद्योजकांना तुम्ही बंगालला पाठवणार का? तुमची भूमिका स्पष्ट करा, असा सवाल शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे. तसेच बॅनर्जींनी राज्यातील उद्योजकांना त्या बंगालमध्ये निमंत्रण द्यायला आल्यात, असा आरोपही शेलारांनी दिला आहे. तसेच ममतांना जय हिंदूराष्ट्र मान्य नसल्यास सेनेची भूमिका काय ?, बांग्लादेशी समर्थकांशी तुमचे नाते काय?, ममता बनर्जी यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता का पाळली ? गुप्त बैठका घेऊन सर्व उद्योगांना बंगालला पाठवत आहेत का?, गुप्त बैठकीत दहशतीच कटकारस्थान झाल्याचा भाजपचा आरोप ?, मंत्र्यासोबत बैठक शासकीय स्तरावर झालेली नसून या बैठकीत नेमके काय झाले हे अद्याप अस्पष्ट नाही, अनेक सवाल शेलारांनी काल (१ डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बॅनर्जीच्या दौऱ्यावर सरकारवर टीका केले आहे.


Next Story
Share it
Top
To Top