"हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

मुंबई | "हे असे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते. हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हाला सांगू नका. महाराष्ट्राचे सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडाला नाही याचे दु:ख आम्ही समजू शकतो," असा टीकास्त्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या केली आहे. शहांनी काल (१९ डिसेंबर) पुण्यातील सभेतून महाविकासआघाडी डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली. राऊतांनी आज (२० डिसेंबर) पत्रकारांशी संवाद साधताना शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायरेक्ट, ब्रोकर आणि ट्रान्सफर यांनी योजना आणली. परंतु महाविकासआघाडीचा अर्थ डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर असा घेतला आहे, असा टोला शहांनी काल (१९ डिसेंबर) पुण्यातील सभेतून टीका केली. यावर राऊतांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "हे असे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते. हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हाला सांगू नका. महाराष्ट्राचे सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडाला नाही याचे दु:ख आम्ही समजू शकतो." "मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही जी तीन-तीन चिलखत घालून महाराष्ट्रात फिरत आहात ना. सीबीआय, ईडी आणि एनसीबी हे तीन चिलखत बाजुला ठेवून आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेऊन लढणारे आहोत. आम्ही मागून हल्ले-प्रतिहल्ले करत नाही. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे," असे राऊत म्हटले.
Next Story
Share it
Top
To Top