"उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये!" राऊतांचा धमकीवजा इशारा

उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये! राऊतांचा धमकीवजा इशारा

मुंबई | "वातावरण सगळे शांत झालेले असताना उगाच काड्या करण्याचं काम कोणीही कोणीही करू नये," असा धमकीवजा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. "ना इकडलं ना तिकडलं. ऐवढच मी त्यांना आमच्या पक्षा आणि महाविकासआघाडीतर्फे आवाहन करतो," असेही राऊत आज (२२ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणालं.

"हे ठाकरे सरकार आहे, येथे कायदेशीर कारवाई करताना गट, तट आणि पक्ष पाहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री होतं. महाराष्ट्रामध्ये अमरावतीसारख्या घटना घडू नये. यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी आगीत तेल न टाकता. शांत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजं," असे आवाहन राऊतांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

आजही भाजप अमरावतीमध्ये आक्रमक आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचल्यावर राऊत म्हणालं, "आक्रमक म्हणजे काय त्यांना परत दंगल करायची, कशा करता आंदोलन करत आहे. जे काय होईल ते कायद्यानं होईल ना. कशा करता आंदोलन करताय, काय आहे. का माहागाईविरोधात आंदोलन करताय, का तिकडे चीन लडाखमध्ये घुसलं म्हणून आंदोलन करताय. कशा करता आंदोलन करताय त्यांनी ते सांगावे," असा उलट सवाल भाजपला विचारला आहे. राऊतांच्या सवालवर भाजपकाय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये

"अमरावती घटनेचं राजकारण पेटवा पेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जावू नयं. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. त्याच अमरातवीच्या पुढे विदर्भात गडचिरोलीमध्ये याच पोलिसांनी या सरकारनं २६ नकक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढे सगळे समान आहे. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली. कोणत्या कारणं पेटवली, त्यांच्या मागे कोण होतं. हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्री आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण सगळे शांत झालेले असताना उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये. ना इकडलं ना तिकडलं. ऐवढच मी त्यांना आमच्या पक्षा आणि महाविकासआघाडीतर्फे आवाहन करतो," असे राऊत म्हणालं.

इंटेलिजेंस फेल होते, शेवटी ती पण मागणसेच

"इंटेलिजेंस फेल होते, कधी कधी इंटेलिजेंस फेल होते शेवटी ती पण माणसेच आहेत. अनेक घटनांच्या संदर्भात इंटेलिजेंस फेल होते. मग काश्मीर आणि त्रिपुरामध्ये होतं. इंटेलिजेंस फेल शेवटी ते माणसे आहेत. तरी सुद्धा अमरावतीची दंगल नियंत्रणात आणली. आणि आज अमरावतीमध्ये शांतता नांदते हे महत्वाचं," असे म्हणत राऊतांनी बाजू सावरली

रझा आकादमीवर तुम्ही का नाही बंदी घातली

रझा आकादमीवर बंदी घाला अशी मागणी फडणवीसांनी केली, असा प्रश्न पत्रकारांनी विचरल्यावर राऊत म्हटलं "तुम्ही का नाही घातली. तुमच्या काळातपण काही प्रकार घडलं होतं, असा उलट सवाल त्यांनी फडवीसांना विचरला आहे. दरम्यान, "सरकार कायद्याच्या संदर्भात कुठे ही नमते घेत नाही. आणि काय करायचं आहे. मला असे वाटते की, आपल्या राज्याचं गृहमंत्री दिलीप वळसं पाटील सक्षम आहेत. अत्यंत सक्षम गृहमंत्री या राज्याला लाभलं आहे. मला असे अजिबात वाटत नाही की, भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणे. म्हणजे हिंदुवर गुन्हे दाखल होण्याचा आरोप करणे हे चुकीचे आहे. जे दंगल खोर आहेत. ज्यांनी अमरावती पेठवली. ज्यांनी अमरावतीच्या जनतेचं आणि सामाजिक मालमत्तेचं नुकसान केले. ते कोणी असू कायदेनं त्यांच्यावर कारवाई करेन एकाच पक्षाचं आहेत. म्हणून ते हिंद किंवा मुस्लमान आहेत. हे चालणार नाही."


Next Story
Share it
Top
To Top