सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

मुंबई | सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुंटेंच्या नियुक्तीचे निर्देश दिले आहेत. कुंटे हे आज (३० नोव्हेंबर) राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. कुंटेंच्या मुख्य सचिव पदाचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

कुंटेंचा आज सेवानिवृत्तीचा शेवटा दिवस होता. राज्य सरकारने केंद्राकडे कुंटेंना ३ महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, केंद्राकडून अद्यापही कुंटेंच्या प्रस्तावावर मंजुरी न मिळाल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवती यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती 'टीव्ही ९ मराठी'ला सूत्रांकडून मिळाली आहे. सिताराम कुंटेंचा भार चक्रवती यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडू मिळाली आहे. देबाशिष चक्रवती हे राज्याचे नवे मुख्य सचिव असणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top